तीच तीच कोफ्ता घरी खाऊन कंटाळात ? तर ट्राय करा एक वेगळ्या चवीची. मक्याची कोफ्ता करी.
आपण हॉटेल ला गेल्यावर मलाई कोफ्ता करी, दुधी कोफ्ता करी, अशा कोफ्ता करी मिळतात. तर आज आपण अशी कोफ्ता करी बघणार आहोत. जे चवीला छान आणि आपण कधी खाल्लेली नसेल.
कोफ्ता करता लागणारे साहित्य
दोन वाट्या मक्याचे दाणे
दोन उकडलेले बटाटे
चार चमचे ओल्या नारळाचा चव
दोन हिरव्या मिरच्या
दोन ब्रेड स्लाईस
मीठ
कोथिंबीर
कोफ्ते तळण्साठी तेल
करीसाठी साहित्य
दोन कांदे
दोन टोमॅटो
एक छोटा आल्याचा तुकडा
एक वाटी साय
एक छोटा चमचा गरम मसाला
कृती
उकडलेले बटाटे किसून घ्या. उकडलेले मक्याचे दाणे नारळाचा चव हिरवी मिरची एकत्र जाडसर वाटावे.
ब्रेड स्लाईस पाण्यात घालून पिळून घ्या. आता उकडलेला बटाटा मका दाणे नारळ मिरचीचे जाडसर मिश्रण आणि ब्रेड स्लाईस सर्व एकत्र करून मळून घेणे. या मिश्रणाचे लहान लहान गोळे करून गरम तेलात मंद आचेवर तळून घ्या.
तुम्हाला जर कमी तेलकट हवे असेल. तर आप्पे पात्रात हे छोटे छोटे गोळे टाकून दोन्ही बाजूंनी थोडे थोडे तेल टाकून शेकवून घ्या.
करी बनवण्याची कृती
कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेला आलं मिक्सर मधून वाटून घ्या त्यामध्ये साय घोटून कांदे टोमॅटो च्या वाटणामध्ये टाका. दोन चमचे तेलावर कांदा टोमॅटो साय घातलेल्या वाटण परतून घ्या. त्यात गरम मसाला टाका.
त्यानंतर एकदा खमंग वास सुटला की त्यामध्ये मीठ टाका. एक वाटी गरम पाणी टाकून करीला एक उकळी आणा. नंतर सर्व्ह करतेवेळी त्यामध्ये कोफ्ता टाका.
वरून कोथिंबीर घालून, करी पोळी पराठा किंवा फुलक्यासोबत वाढावी.
मक्याच्या गोडसर चवीमुळे या कोफ्ता करीला एक वेगळीच चव येते.
